धक्कादायक; मुख्याध्यापकानेच दाखवला अश्लील व्हिडीओ

17 Sep 2018 14:21:02


 

 

पुणे : पुण्याच्या एका इंग्रजी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकानेच १४ वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात शाळेतील समुपदेशक व मुख्याध्यापक या दोघांविरुद्ध वानवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने १४ वर्षाच्या मुलाला कॅबिनमध्ये बोलावून आपल्या मोबाईलमधील अश्लिल व्हिडीओ दाखवून त्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. विन्सेट परेरा असे या मुख्याध्यापकाचे नाव असून तो पुजारी असल्याची देखील माहिती सांगितली जात आहे. मुलाने घाबरून हा प्रकार शाळेच्या समुपदेशिकेला सांगितला. मात्र, तिनेदेखील मुलाला धमकावत गप्प राहण्यास सांगितले. यामुळे हिंमत वाढलेल्या मुख्याद्यापकाने आणखी एक वेळेस असे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपी गेल्या दोन आठवड्यांपासून शाळेत आला नसून याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0