इस्त्रोची आणखी एक गगनभरारी!

17 Sep 2018 14:33:58

 


 
 
 
श्रीहरीकोटा : इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रविवारी श्रीहरीकोटा येथून दोन ब्रिटिश उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आले. सॅटेलाइट कॅरिअर ‘पोलर सॅटेलाइट लाँच व्हेहिकल’ पीएसएलव्ही सी-४२ च्या मदतीने हे प्रक्षेपण करण्यात आले.
 
 
 
 

'NOVASAR' आणि 'S1-4' अशी या दोन उपग्रहांची नावे आहेत. या दोन्ही ब्रिटिश उपग्रहांचे वजन ८८९ किलोग्रॅम आहे. इस्त्रोकडून सोडण्यात आलेले हे दोन उपग्रह पृथ्वीवरील घडामोडींवर लक्ष ठेवणार आहेत. फॉरेस्ट मॅपिंग, बर्फ आच्छादन, जमिनीचा वापर, पूर व नैसर्गिक आपत्ती यांवर या उपग्रहांद्वारे विशेष लक्ष ठेवता येणार आहे. जागतिक अंतराळ क्षेत्रात भारताची ३०० बिलियन डॉलरपेक्षा जास्त भागीदारी आहे. कमी खर्चात अंतराळात उपग्रह पाठवण्याचे काम इस्त्रो करत आहे. इस्त्रोच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0