इस्त्रो करणार ब्रिटीश उपग्रहांचे प्रक्षेपण

16 Sep 2018 14:32:12

 
 

 नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ रविवारी ‘पीएसएलव्ही-सी ४२’च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन उड्डाण करणार आहे. श्रीहरिकोट्ट येथील सतीश धवन या अंतराळ केंद्रातून रविवारी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी अंतराळात झेपावणार आहे. हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचे इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांनी म्हटले आहे. या उपग्रह प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नसेल, असेही त्यांनी सांगितले.

 
 

उपग्रहांचे एकत्रित वजन ८८९ किलोग्रॅम आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबतही माहिती घेणे शक्य होणार आहे. वनांचे मॅपिंग, पूर आणि नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवणे तसेच इतरही काही कामांसाठी यांचा उपयोग होईल. हे उपग्रह पृथ्वीपासून ५८३ किमी उंचीवर सोडण्यात येणार आहेत. सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीजलिमिटेडने हे उपग्रह विकसित केले आहेत.

 
 
 
 
 
 

के. शिवन यांनी याआधी इस्रो सात महिन्यात १९ अभियानं राबवणार असल्याची माहिती दिली होती. त्यामध्ये १० सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासह नऊ यान प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. सप्टेंबर ते मार्च या महिन्यात या मोहिमा राबवण्यात येणार आहेत. या पूर्वी इस्त्रोने एप्रिल २०१३मध्ये इटलीच्या उपग्रहाला अंतराळात पाठवले. २०१५ साली ब्रिटनचे पाच उपग्रह अंतराळात पाठवले होते.

 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0