गणपती दर्शनासाठी अमित शाह मुंबईत

14 Sep 2018 13:22:08

 


 
 
 
मुंबई : भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे आज गणपती दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागचा राजा व इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत. अमित शाह दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. आज दुपारी १२ वाजता मुंबई विमानतळावर अमित शाह यांचे आगमन झाले.
 
 
 
 
 
त्यानंतर शाह यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. सिध्दिविनायक मंदिरातील गणपतीचे दर्शनही ते घेणार आहेत. केवळ गणपती दर्शनासाठी अमित शाह यांचा हा एकदिवसीय मुंबई दौरा आहे. मुंबईतील गणपती दर्शन झाल्यावर अमित शाह रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0