गणेशोत्सवाला गालबोट, एका गणेशभक्ताचा मृत्यु

    दिनांक  13-Sep-2018

 


 
 
 
 नालासोपारा : गणेशोत्सव मंडळाची मिरवणुक नालासोपाऱ्यातील गावदेवी परिसारातून जात असताना टँकरची धडक लागून एका तरुणाचा मृत्यु झाला आहे. हा तरुण श्रीहरी कमला नगर गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता होता. कमलेश बिंद असे त्याचे नाव होते. नालासोपाऱ्यातील धवणीबाग तलावाजवळ ही घटना घडली आहे. गणपती मिरवणूक जात असताना ही घटना घडली. धडक देऊनही हा टँकर सरळ पुढे जात होता. मिरवणुकीतील व आसपासच्या संतप्त जमावाने या टँकर चालकाला टँकर बाजूला घेण्यास सांगितले. परंतु पोलिसांनी या जमावावर लाठीचार्ज केला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
 

ही घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी तरुणाने याबाबत माहिती दिली की आम्ही तिघे रस्सी धरुन उभे होतो. आमच्यासोबत कमलेशही होता. हा टँकर आधी एका ठिकाणी उभा होता. पण अचानक टँकर चालकाने तो पुढे घेतला. टँकरचा रॉड कमलेशच्या डोक्याला लागल्याने तो खाली कोसळला. कमलेश परत उठण्याचा प्रयत्न करत असतानाच टँकरचे मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले.

 
    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/