इस्रोची पहिली व्यावसायिक भरारी

12 Sep 2018 14:30:58



 
 

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था प्रत्येकवेळी एक वेगळा इतिहास रचत चालली आहे. आता इस्रो लवकरच एक मोठी झेप घेणार आहे. १६ सप्टेंबर, २०१८ रोजी इस्रो भारतातले पहिले व्यावसायिक उपग्रह पीएसएलव्ही सी-४२ अवकाशात झेप घेणार आहे. इस्रोची ही पहिली व्यावसायिक झेप असेल. यासोबत कुठलेही भारतीय उपग्रह पाठवणार नाही. भारतातील श्रीहरीकोटामधील सतीश धवन अवकाश केंद्रातून दोन ब्रिटिश उपग्रह झेपावणारे आहेत. या यशासोबतच भारत देश त्या पंक्तींमध्ये जाऊन बसेल ज्यांच्याकडे परदेशी उपग्रह अवकाशात पाठवण्याचे तंत्र आहे.

 

हे आपले पूर्णतः व्यवसायिक लाँच असेल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली. ४५० किलो एवढ्या वजनाच्या या उपग्रहांची निर्मिती सर्रे सैटेलाइट टेक्नोलॉजी लिमिटेड (एसएसटीएल) यांनी केली आहे. या संदर्भात इस्रोचा एंट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार झाला आहे. इस्रो सतत आपली क्षमता आणि तंत्र वाढवण्याच्या उद्देशाने अग्रेसर आहे. यामुळे आपण जास्तीत जास्त विदेशी उपग्रह लाँच करू शकू आणि विदेशी पैसे भारतीय अर्थव्यवस्थेत आणू शकू.

 
Powered By Sangraha 9.0