एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत पास

12 Sep 2018 18:24:06

 

 
 
 
मुंबई : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह एसटीने प्रवास करण्यास वर्षातील सहा महिन्यांसाठी मोफत पास दिला जाणार आहे. अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची ही मागणी होती. अखेर दिवाकर रावते यांनी ही मागमी मान्य केली आहे.
 

एसटीमध्ये सेवेत असताना एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसाठी पुरेसा वेळ द्यायला मिळत नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर तरी त्यांना आपल्या कुटंबासोबत प्रवास करता यावा. या प्रवासासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सवलत देण्यात यावी अशी मागणी होती. ही मागणी आता पूर्ण झाली असल्याने एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0