मुंबई: यूआईडीएआईने दिलेल्या माहितीनुसार आधारचा डेटाबेस हॅक केल्याची बातमी खोटी आहे असे सांगण्यात आले आहे. आधार प्राधिकरणाने सांगितले आहे कि अहवालानुसार या बातमीमध्ये तथ्य नसून कोणीही आधारचा डाटाबेस हॅक करू शकत नाहीत. रिपोर्टमध्ये करण्यात आलेले दावे आधारहीन असून डेटाबेसमध्ये घुसखोरी करता येणे शक्य नाही, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
नुकतेच 'हफिंग्टनपोस्ट' या वेब साईटच्या अहवालानुसार असे सांगण्यात आले होते कि, आधार एनरोलमेंट सॉफ्टवेअर हॅक केले आहे. डेटाबेसमधील सॉफ्टवेअर पॅचद्वारे घुसखोरी करता येऊ शकते असा तो दावा होता. अनधिकृतपणे जगात कोणीही व्यक्ती केवळ २५०० रुपयांमध्ये सहजरित्या आपला खोटा आधार आयडी बनवू शकतात. पण या अहवालात सादर केल्याची बातमी खोटी असल्याची माहिती यूआईडीएआईने दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/