मुंबई-गोवा मार्गावर अपघातात पाच ठार

11 Sep 2018 14:49:56


 

 

मुंबई मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील लांजा तालुक्यानजीक भीषण अपघात झाला. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आणखी दोघे अपघातात जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
 
मुंबईगोवा महामार्गावर राजापूर वाकेडघाटीजवळ कार आणि ट्रॅव्हलची धडक झाली. त्यात कारचा चुराडा झाला. अपघातातील जखमींची परिस्थिती चिंताजनक आहे. मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समजू शकलेले नाही. कारमधील प्रवासी हे सिंधुदुर्गच्या दिशेने जात होते.
 

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कारने सिंधुदुर्गातील मूळ गावी जात होते. वाकेडघाटीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला त्यांच्या कारने धडक दिली. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेले आहे. या दरम्यान मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0