आ. केळकर यांनी दिल्या चाकरमान्यांना शुभेच्छा

10 Sep 2018 17:33:57


 

 

ठाणेदि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता खोपट एसटी स्थानकावरुन गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणारी पहिली एसटी सुटली. प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार संजय केळकर यावेळी उपस्थित होते. आमदार केळकर यांच्या मार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती सणानिमित्त खोपट एसटी स्थानकांवर डॉक्ट व रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. प्रवाशांच्या अल्पोपहाराची ही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. कार्यक्रमाला नगरसेवक सुनेश जोशी, ठाणे जिल्हा हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सीताराम राणे, विलास साठे, आरिफ बडगुजर, डॉ. साळवे, खोपट एसटी स्थानकाचे प्रमुख रमेश यादव, व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0