मनसे कार्यकत्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड

10 Sep 2018 18:01:57

 


 
 
मुंबई : काँग्रेस व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मुंबई उपनगरातील भाजपचे दिंडोशी कार्यालयाची मनसे कार्यकत्यांनी तोडफोड केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, अशा सूचना दिल्या असतानाही कार्यकत्यांनी त्याकडे दुलर्क्ष केले आहे. भारत बंदला मनसे कार्यकर्ते पाठींबा देतील, अशी सूचना पक्षातर्फे जारी करण्यात आली होती, मात्र कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. वॉर्ड क्रमांक 43 येथील नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या कार्यालयाचे नुकसान करण्यात आले आहे.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
 
Powered By Sangraha 9.0