शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ नागपूरात बॅनर्स

10 Sep 2018 18:39:09

 

 
 
 
नागपूर : देशभर चर्चा चालू असलेल्या शहरी नक्षलवाद प्रकरणाला रविवारी एक वेगळे वळण लाभले. नागपूरात शहरी नक्षलवादाच्या समर्थनार्थ काही ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते. हे बॅनर लावणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे आरोपी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’चे आहेत. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.नागपूरात शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले गेले. पेरिमिली येथे हे बॅनर लावण्यात आले होते. हे ठिकाण गडचिरोलीपासून १३५ किलेमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अशा प्रकारे उघडपणे नक्षलवाद्यांचे समर्थन करण्यात आले आहे.
 
 
भीमा-कोरेगाव प्रकरणी अटक केलेल्या १० संशयित नक्षली कार्यकर्त्यांना सोडण्यात यावे अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली. शोमा सेन, अॅडव्होकेट सुरेंद्र गाडगीळ, गडचिरोलीतील महेश राऊत, दिल्लीतील रोना विल्सन आणि मुंबईतील सुधीर ढवळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या पाचजणांची नावे या बॅनरवर लिहिली होती. तसेच हे पाचजण हे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते नक्षलवादी नाहीत असे या बॅनरवरती लिहिण्यात आले होते. असे पेरिमली पोलिसांनी या बॅनर्सचे वर्णन करताना सांगितले. पेरिमली पोलिसांनी हे बॅनर हटवले आहेत. हे बॅनर्स पुढील तपासणीसाठी पुणे पोलिसांकडे पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती डीआयजीपी अंकुश शिंदे यांनी याप्रकरणी दिली.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0