धुळयात मराठा आंदोलक आक्रमक खा.डॉ.हीना गावितांची गाडी फोडली

05 Aug 2018 16:04:28

 
धुळयात मराठा आंदोलक आक्रमक खा.डॉ.हीना गावितांची गाडी फोडली
धुळे, 5 ऑगस्ट
खा. डॉ.हीना गावित या काही कामानिमित्ताने रविवारी धुळे येथे आल्या होत्या.जिल्हाधिकारी कार्यालया जवळ खा.डॉ.हीना गावित आल्या असता मराठा आरक्षण आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी खा.डॉ.गावित यांच्या गाडीवर चढुन गाडीची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या गोंधळात खा.डॉ.हीना गावित यांना सुखरुप बाहेर काढले.तसेच पोलीसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
 
 
घडलेल्या प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक सुरु आहे. खासदारांच्या गाडीच्या झालेल्या तोडफोडीबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या मराठा आंदोलकांना सोडुन देण्याची मागणी आंदोलक करत आहे.
 
 
काही महिन्यांपुर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लाखो नागरिकांनी शिस्तबध्द मुकमोर्चो काढले गेले. या शांततेने निघालेल्या या मोर्चांचे सर्वत्र कौतुक झाले. परंतु अचानक काही दिवसांपासुन मराठा आरक्षणसाठी होत असलेल्या आंदोलनांमध्ये हिंसा होत असल्याने या मागचे षडयंत्र पोलीसांनी शोधुन काढले पाहिजे अशी चर्चा नागरिक करत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0