बिमस्टेकसाठी पंतप्रधान मोदी नेपाळमध्ये दाखल

    दिनांक  30-Aug-2018

 
 
काठमांडू : नेपाळमध्ये होत असलेल्या यंदाच्या बिमस्टेक शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी नेपाळचे उपपंतप्रधान ईश्वर पोकरेल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोदींचे स्वागत केले आहे.
 
यंदाची बिमस्टेक परिषद ही नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बिमस्टेक परिषदेचे सर्व सभासद राष्ट्रांचे प्रमुख तसेच प्रतिनिधी मंडळ या परिषदेसाठी नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज सकाळी वायू सेनेच्या विशेष विमानातून नेपाळसाठी रवाना झाले होते. यानंतर थोड्याच वेळापूर्वी त्यांचे काठमांडू विमानतळावर आगमन झाले. यासाठी नेपाळ उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.
 
 
पंतप्रधान मोदी हे एकूण दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी बिमस्टेक परिषदेला ते संबोधित करणार आहेत. तसेच नेपाळच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील ते करणार आहेत. याचबरोबर परिषदेला आलेल्या विविध देशाच्या राष्ट्रप्रमुखांशी देखील द्विपक्षीय चर्चा ते करणार आहेत.