खा. कपिल पाटील यांच्याकडून पालिकेच्या कारभाराची ‘झाडाझडती’

30 Aug 2018 22:44:40



ठाणे : भिवंडी शहरातील खड्डे, कचरा आणि वाहतूककोंडीच्या मुद्द्यावरून भाजपचे खा. कपिल पाटील यांनी पालिकेच्या कारभाराची झाडाझडती घेत अधिकाऱ्या ना धारेवर धरले. महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे हजारो नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर कामे करण्याची तंबीही दिली. भिवंडी शहरातील रस्त्यांची पावसाळ्याच्या काळात दुरवस्था झाली. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच गल्ल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले त्यामुळे शहरातील वाहतूककोंडीत भर पडली. काही दिवसांपासून शहरातील कचरा उचलण्यातही महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. कपिल पाटील यांनी लोकप्रतिनिधी व पालिका अधिकाऱ्या बरोबर बैठक घेतली.

 

महापालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले. मात्र, त्याबाबत पालिका प्रशासनाकडून जुजबी उपाययोजना झाली. पालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त होते, त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्या ना कारभार सुधारण्याची गरज आहे, असे कपिल पाटील यांनी सुनावले. तर, गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती आयु्क्त मनोहर हिरे यांनी दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0