कचऱ्या चे व्यवस्थापन होणार ‘हायटेक’

29 Aug 2018 22:49:36


 

 

मुंबई : मुंबईतील कचऱ्या चे व्यवस्थापनहायटेककरण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गाड्यांच्या हालचाली टिपण्यासाठी अत्याधुनिक नियंत्रणकक्ष सुरू करणार आहे. यामुळे कचऱ्या त गोलमाल करणाऱ्या ठेकेदारांना चाप लागेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
 

मुंबई महापालिकेत नालेसफाई, रस्ते, कचरा घोटाळे उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर कचरा वाहतूक कामांमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी पालिकेने अत्याधुनिक नियंत्रण कक्ष सुरू करणार आहे. कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात लार्सन अण्ड टुर्बोसारख्या तज्ज्ञ कंपनीसोबत चर्चा करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले. कचऱ्या च्या विषयावर गेले काही दिवस बैठका सुरू आहेत. कचरा व्यवस्थापनातील काही अधिकार्यांनी नुकतीच जर्मनीला भेट दिली होती. त्यावेळी तेथे पाहिलेल्या काही संकल्पनाची मुंबईत अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये कचऱ्या च्या डब्याला लावण्यात येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन सुविधेचाही समावेश आहे.कचऱ्या चे डबे कचऱ्या ने भरले आहे की नाही, तेही नियंत्रण कक्षातून समजणार आहे. तसेच कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या मागे आणि पुढे सीसीटीव्ही लावले जाणार आहेत, तर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीममुळे गाडीच्या प्रत्येक हालचालीवर नजर असणार आहे. त्यामुळे कचरा उचलला आहे की नाही हेही समजणार आहे. या सर्व बाबींची नियमित नोंद कचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी चालवत असलेल्या नियंत्रण कक्षामध्ये राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

कारवाईमुळे पालिकेत पारदर्शकता

गेल्या काही वर्षात कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च झाले आहेत. गेल्या सहा वर्षांत कारवाईचा बडगा उगारण्यामुळे पालिकेचे ४०० कोटी वाचले आहेत. जास्त पैसे मिळविण्यासाठी कचऱ्या मध्ये डेब्रिज मिसळणाऱ्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांवर पालिकेने कारवाई केली. त्यांना सातत्याने दंड आकारले. काहीजणांवर गुन्हा नोंदविला. या कारवाईमुळे पालिकेत पारदर्शकता येण्यास मदत झाली.

विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0