ब्रिज खेळासाठी अकॅडमी उभारणार - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

29 Aug 2018 17:47:58



डोंबिवली : ब्रिज या आंतरराष्ट्रीय खेळाचे तज्ज्ञ आनंद ऊर्फ केशव सामंत यांच्या चमूने २०१८ एशियन कांस्यपदक पटकवल्याने राज्यभर त्यांचे कौतुक केले जात आहे असेच कौतुक त्यांचे डोंबिवली शहरात ही होत आहे . यासाठी भाजप पूर्व मंडळाच्या माध्यमातून सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सामंत याचें सत्कार करीत या शहरात इनडोअर गेमसाठीची अकॅडमी स्थापन करण्याचे रायगड जिल्हा पालकमंत्री तथा डोंबिवलीचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आश्वासन यांनी दिले.

 

सामंत हे डोंबिवलीचे रहिवासी आहेत.यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय ब्रीज संघाने आशियाई क्रिडा स्पर्धेत कांस्य पदक पटकवले आहे.प्रशिक्षक आनंद सामंत हे स्वत: उत्तम खेळाडू असून, त्यांनी या खेळामध्ये आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.आनंद सामंत हे आयआयटीमध्ये कार्यरत होते. सेवानिवृत्त होऊन त्यांना ६ वर्षे झाली. १९७३ पासून ते ब्रिज खेळत आहेत. जकार्ता येथे सुरू असलेल्या एशियन स्पोर्ट्समध्ये ब्रिज या खेळात कांस्यपदक मिळवून भारताने बाजी मारली. प्रथमच ब्रिज खेळाला त्यात सहभाग घेण्याची संधी मिळाली होती, त्यात डोंबिवलीकर आनंद सामंत यांनी कोचची भूमिका बजावली होती, सामंत यांनीच केलेल्या मेहनतीमुळे त्याना आशिया स्पर्धेत संधी मिळाली, त्याबद्दल राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सामंत यांचा सत्कार केला. त्यावेळी सामंत दाम्पत्य उपस्थित होते

 

दरम्यान यावेळी सामंत यांनी आपल्या सत्कारा बाबत

गावकीचा सत्कार महत्वाचा असतो, भारतात आल्यावर सर्व प्रथम राज्यमंत्री चव्हाण यांनी सत्कार केला याचा खूप आनंद आहे. या खेळाचा मला व्यक्तिगत जीवनात खूप लाभ झाला असे सामंत म्हणाले.तसेच आपल्या शहरात या खेळासाठी एखादी अकॅडमी व्हावी अशी मागणी केली . यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी तत्काळ पूर्वेतील राजाजीपथ रोड ही अकॅडमी केली जाईल तसेच त्या ठिकाणी लागणाऱ्या मार्गदर्शना साठी सामंत यांची मदत घेतली जाईल व यासाठी मी माझा निधी देईन असे ही सांगितले

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
Powered By Sangraha 9.0