धावपटू मनजीत सिंहला सुवर्णपदक

28 Aug 2018 19:27:43


 

 

जकार्ता : आशियाई स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय धावपटूंनी दोन पदके जिंकली असून धावपटू मनजीत सिंहने पुरुष धावपटू गटामध्ये ८०० मीटर शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तर याच शर्यतीत जिनसन जॉन्सनने रौप्य पदक पटकावले आहे. एकाच शर्यतीत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाल्याने भारतभरातून त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.
 
८०० मीटर लक्ष असलेले अंतर मनजीतने १ मिनिट ४६.१५ सेकंदात तर जॉन्सनने १ मिनिट ४६.३५ सेकंदात पार केले. संयमी सुरुवात केल्यानंतर मोक्याच्या क्षणी दोन्ही भारतीय धावपटूंनी आगेकूच केल्याने ही दोन्ही पदके भारताच्या पदरात पडली आहेत. दरम्यान, कतारच्‍या अबु बाकर अब्‍दुल्‍लाने कांस्‍यपदक जिंकले असून १ मिनिट ४६.३८ मिनिटात त्‍याने ही शर्यत पुर्ण केली.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0