गूगल असिस्टंट आता मराठीत

28 Aug 2018 16:41:50


 

नवी दिल्ली : गूगल फॉर इंडियाच्या गुगल असिस्टंटच्या चौथ्या आवृत्तीसाठी आज भारताची राजधानी नवी दिल्ली येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये गूगलने भविष्यातील आपल्या योजनाच्या घोषणा केल्या आहेत. यात आता गुगलचे 'गुगल असिस्टंट' मराठीत उपलब्ध होणार असल्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती गूगलचे इंजिनिअरिंग डायरेक्टर प्रवीर गुप्ता यांनी दिली.
 

गुगल असिस्टंट यापूर्वी भारतात हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांमध्ये उपलब्ध होते. आता लवकरच ते मराठीसह भारताच्या अन्य प्रमुख सात प्रादेशिक भाषामध्ये उपलब्ध होणार आहे. या नवीन अपडेटमुळे आता तुम्ही गूगलशी आपल्या मायबोली मराठीतून संवाद साधू शकता. यासाठी तुम्हाला इंग्रजी व हिंदीतून विचारायची गरज भासणार नाही. दरम्यान, मातृभाषेतील गूगल असिस्टंट आल्याने युजर्सला सर्च करणे व इतर वापरासाठी फायदा होणार असून अशिक्षित लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0