अंभीरे पितापुत्रांमुळे मिळाले ११ जणांना जीवदान!

    दिनांक  26-Aug-2018


 

 

पालघर: डहाणू किनाऱ्यापासून जवळपास ५० किलोमीटर खोल समुद्रात प्रचंड वादळीवाऱ्यामुळे भाग्यलक्ष्मी ही बोट उलटली होती. परंतु आनंद अंभीरे व त्यांचे वडील अशोक अंभीरे यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तसेच आपल्या बोटीचा विचार न करता या दुर्घटनेतील ११ मच्छीमाऱ्यांना बोटीसह वाचवले. 

 
 दि. १९ ऑगस्टला धाकटी डहाणू येथील ११ जण समुद्रात मच्छीमारीसाठी समुद्रात गेले होते. अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे भानुदास तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट ११ जणांसह समुद्रात उलटली होती. मात्र चालक भानुदास तांडेल यांनी प्रसंगावधान दाखवत वायरलेस फोन केला. गुंगवाडा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि रा. स्व. स्वयंसेवक अशोक अंभीरे यांच्या पवनसाई या बोटीला तो वायरलेस मिळाला. यावेळी अंभिरे यांनी पीडित भाग्यलक्ष्मी बोटीतील खलाशांना धीर दिला व त्यांच्याकडून जीपीएस नंबर मागितला. जीपीएस नंबर मिळाल्यानंतर अंभीरे यांनी बुडणाऱ्या भाग्यलक्ष्मी बोटीच्या दिशेने आपली बोट फिरवली. तसेच बोटीतील आपल्या इतर सहकाऱ्यांना दुर्घटनेबद्दल माहिती दिली. दरम्यान भाग्यलक्ष्मी बोटीमधील खलाश्यांनी पाण्यात तरंगणारे साहीत्यावर लटकुन समुद्रात पोहण्यास सुरुवात केली होती. तब्बल पाऊण तास त्यांना समुद्रात पोहावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे, या ११ जणांमधील ४ जणांना पोहता येत नव्हते. त्यानंतर अंभीरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी भाग्यलक्ष्मी बोटीचा शोध घेऊन त्या ११ खलाश्याना वाचवले. त्यांना आपल्या बोटीवर घेतले. अथक परिश्रमानंतर तब्बल ४३ तासांनी मंगळवारी भाग्यलक्ष्मी या बोटीने तब्बल ४३ तासानंतर किनारा गाठला. या बचावकार्यानंतर अंभीरे कुटुंबियांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/