तेरणा हॉस्पिटलतर्फे डोळखांब येथे ५०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

24 Aug 2018 17:27:27


 

ठाणे: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था , झडपोली व नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच भक्तिवेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २३ ऑगस्ट रोजी कुणबी समाज हॉल,डोळखांब, शहापूर येथे पाचशे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात सीबीसी, ईसीजी, रक्तातील साखरेचे प्रमाण, कॅन्सर, हिअरिंग टेस्ट, रक्तदाब व एचबी तपासण्यात आले.
 

या शिबीराचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केले. यावेळी अपर्णाताई खाडे व हेमांगी ताई पाटील यांची विशेष उपस्थिती होती. ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून डॉक्टरांसमोर बोलते व्हा , शरीरात होत असलेल्या चांगल्या -वाईट बदलांची डॉक्टरांना माहिती द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले. निदान झालेल्या रुग्णांना शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे देण्यात आली. महिला व बालकांना लसीकरण व आहाराबाबत मार्गदर्शन या शिबीरात करण्यात आले.

Powered By Sangraha 9.0