नंदुरबार न.पा. मुख्याधिका-या विरुध्द गुन्हा दाखल

24 Aug 2018 11:59:47
 
 

नंदुरबार न.पा. मुख्याधिका-या विरुध्द गुन्हा दाखल

 
नंदुरबार , 24 ऑगस्ट
संगनमताने गोवंशांचे अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य सचिव व अन्य लोकांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामूळे खान्देशात खडबळ उडाली आहे.
 
23 रोजी शहरातील कचरा डेपो येथे संगनमत करुन कत्तल केलेल्या गोवंशाचे अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती फिर्यादी केतन दिलीपसिंह रघुवशी  यांना मिळाली. केतन रघुवंशी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठले . घटनास्थळी मोठया प्रमाणात गो तस्करी होवून अवैध पध्दतीने गो हत्त्या झाल्याचे दिसून आले. म्हणून केतन रघुवंशी यांच्या फिर्यादीवरुन गीरी, मुख्याधिकारी नंदुरबार नगर पालिका, आरोग्य सचिव नंदुरबार नगर पालिका, इतर 15 ते 20 जण आणि ए.बी.एनव्हायरो कंपनी स्वच्छता ठेकेदार यांच्या विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीकारी, पो.नि.स्था.गु.शाखा, तालुका पो.नि.चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
 भा.द.वि. 429 , 408 , 295 (अ), 268, 269, 166 (अ), 168 ,120 (ब), महाराष्ट्र किपींग अॅन्ड मुव्हमेंट कॅटल इन अर्बन एरिया कंट्रोल 3, 13 सह पशु क्रुरता अधि. का.क. 11 (1), महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा कलम 5,6,9,11 सह महा पो अधि. क 105 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0