रायबरेलीची ‘धाकड़ गर्ल’

    दिनांक  24-Aug-2018   


 

उत्तर प्रदेशातील एका कठोर मेहनत घेऊन स्वप्नपूर्तीसाठी झगडणाऱ्या मुलगी... तिचे नाव सबा मुतुल आब्दी, वय फक्त १२ वर्षे आणि काम मात्र जागतिक पटलावर कोरण्याजोगे...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

आपले निहित ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या संकटाला सामोरे जातो, तो नेहमीच यशस्वी होतो. आज आपण उत्तर प्रदेशातील अशाच एका कठोर मेहनत घेऊन स्वप्नपूर्तीसाठी झगडणाऱ्या मुलीची माहिती घेणार आहोत. सबा मुतुल आब्दी हे तिचे नाव, वय फक्त १२ वर्षे आणि काम मात्र जागतिक पटलावर कोरण्याजोगे.

 

केवळ १२ वर्षे वय असलेली सबा आपल्या तलाक मिळालेल्या आईसह रायबरेलीच्या भाजी मंडईजवळ असलेल्या जफर मार्केटच्या दाटीवाटीने वसलेल्या एका छोट्याशा घरात राहते. सबाची आई घरीच शिवणकाम करते आणि त्यातूनच घरखर्च भागवते. खरे म्हणजे एका छोट्याशा ठिकाणी राहणाऱ्या , शिवणकाम करणाऱ्या आईसोबत राहणाऱ्या मुलीचे स्वप्न असेल ते कोणते? चांगले खायला-प्यायला-लिहायला-शिकायला हवे इतकेच! पण नाही, सबाने स्वप्न पाहिले ते कुस्तीचा फड गाजवण्याचे! हो, आणि सबाने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना आपल्या छोट्याशा आयुष्यात मिळवलेले यश हे इतरांनाही प्रेरणादायी ठरले. तिने मिळवलेल्या यशाची माहिती जाणून तुम्हीही हैराण व्हाल, हे नक्की.

सबा रायबरेलीच्या चकामत पुस्त शाळेत सातवीच्या वर्गात शिकते. बालपणापासून वेगवेगळ्या खेळांची विशेष आवड असणाऱ्या सबाने आतापर्यंतग्रेपलिंगम्हणजेच महिलांच्या कुस्तीमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक, नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक, मुरादाबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक तर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. सबासारख्या मुलीने मिळवलेले हे यश जितके कौतुकास्पद, तितकेच तिच्या अथक परिश्रमाचे चीज करणारेही, पण सबाची एवढीच ओळख नाही. कारण राज्य, राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धा गाजवल्यानंतर सबाला वेध लागले ते जगाचे मैदान जिंकण्याचे. आपल्या याच ध्यासपूर्तीच्या दिशेने शड्डू ठोकत पुढे जाणारी सबा आता कझाकिस्तानमध्ये सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ती कझाकिस्तानला पोहोचली आहेच, पण तिचे इथपर्यंत पोहोचणे मुळीच सोपे नव्हते.

 

एका मुलाखतीत सबाने आपल्याबद्दल असे सांगितले की, “मी लहान असतानाच माझ्या अब्बूंनी अम्मीला तलाक दिला. नंतर कोणत्याही आधाराशिवाय माझ्या अम्मीने मला फक्त शिकवलेच नाही, तर माझी खेळातली आवड लक्षात घेऊन ग्रेपलिंग प्रशिक्षणासाठीही दाखल केले. वयाच्या केवळ बाराव्या वर्षी मला ग्रेपलिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली, पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. कितीतरी वेळा आर्थिक अडचणी समोर आल्या. प्रत्येकवेळी अडचणीतून सुटण्याची धडपड करावी लागली, पण त्या प्रत्येक धडपडीवेळी कोणी ना कोणी एक फरिश्ता बनून मदत केलीच केली. आता माझे एकच स्वप्न आहे की, मला देशाचे प्रतिनिधीत्व करायची संधी मिळावी आणि मी देशासाठी पदक जिंकावे.” सबाची हीच इच्छा पुढच्या महिन्यात पूर्ण होत आहे हे विशेष.

 

कझाकिस्तानमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत सबाची निवड तर झाली, पण तिचे तिथपर्यंत पोहोचणे मुळीच सोपे नव्हते, हा उल्लेख वर आलाच आहे. असे का? सप्टेंबरमध्ये होऊ घातलेल्या जागतिक स्पर्धेत खेळण्यासाठी लाख १० रुपयांची गरज होती. हातावर पोट असणाऱ्या सबाची आई तर इतके पैसे भरू शकत नव्हती. विनंती केल्यानंतर सबाच्या घरची बिकट आर्थिक परिस्थिती पाहून तिच्या ग्रेपलिंग अकॅडमीने फीमधील ५० हजार रु. माफही केले. पण तरीही आणखी लाख ६० हजार रुपयांची गरज होतीच. कसे जमवणार इतके पैसे, याच विचारात सबाने गेल्या एक महिन्यापासून रायबरेली आणि लखनौदरम्यानच्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्या कडे मदतीची मागणी केली. मोठ्या आशेने सरकारी कार्यालयात हेलपाटे घालणाऱ्या सबाला कोणीतरी मदत करेल असे वाटत होते, पण कोणीही काहीही दिले नाही.

 

अखेर सबा रायबरेलीतील बछरवां मतदारसंघाचे . किशन कुमार यांना भेटली. तिने तिची आतापर्यंतची निरनिराळ्या स्पर्धांतली बहारदार कामगिरी त्यांना सांगितली, पदके, प्रमाणपत्रे दाखवली. सुरुवातीला एवढ्या कमी वयाची मुलगी जागतिक स्पर्धेत आणि तेही कुस्तीत देशाचे प्रतिनिधीत्व करणार हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. नंतर . किशन कुमार यांनी तिला मदतीसाठी होकार तर दिलाच, पण राज्याच्या क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिले. गेल्याच महिन्यात म्हणजे तिला लाख ६० हजारांची मदत मिळाली आणि ग्रेपलिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी सबा कझाकिस्तानला रवानाही झाली. सबाचे तिथे सध्या प्रशिक्षण सुरू असून ते सप्टेंबरदरम्यान जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यावेळी केवळ रायबरेली वा उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशाचेही तिच्या कामगिरीकडे लक्ष असेलच. सबा आपल्या स्वप्नांना गवसणी घालेलच,यात काही शंका नाहीच, आपणही आपल्याकडून तिला यशासाठी शुभेच्छा देऊया!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/