अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम

23 Aug 2018 10:09:26
 
 
 
मुंबई :  अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे अधिवक्ता आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एका खास कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. वी.टी. वाळवलकर व्याख्यानमालेंतर्गत 'कंसेप्ट्स अॅण्ड प्रिसिंपल्स इन सर्व्हिल लॉ या विषयावर आज मुंबईच्या चर्चगेट येथील सिडनहेम कॉलेज येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अॅड. विजय पी. वैद्य या विषयावर बोलणार आहेत.
 
सायंकाळी ६ ते ७.३० या वेळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खास बाब म्हणजे या कार्यक्रमात कायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. तसेच हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.
 
कायद्याच्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा करिअरच्या पुढील वाटचालीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच अधिकाधिक अधिवक्ता आणि लॉ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन देखील संस्थेतर्फे करण्यात आले आहे. नावनोंदणी करण्यासाठी ९८२०९२९१३८, ९८१९०७४९५७ या क्रमांकावर संपर्क साधावा. 
Powered By Sangraha 9.0