आशियाई स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण पदक

20 Aug 2018 10:28:37

बजरंग पुनियाची अभूतपूर्व कामगिरी

 
 
 
भारताचे खेळाडू सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावत आहेत. आशियायी खेळामंध्ये काल नेमबाजीत कांस्य पदक जिंकल्यानतर आता भारताचा कुश्तीपटू बजरंग पुनिया याने सुवर्ण पदक जिंकत भारताचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले आहे. ६५ किलोग्राम वजन गटात फ्रीस्टाइल कुश्ती प्रकारात त्याने जापानच्या ताकातानी दाईची याला ११-८ अशा फरकाने मात देत विजय मिळवला.
 
 
बजरंगने आपले हे सुवर्ण पदक दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित केले आहे. 
 
 
 
अत्यंत अटीतटीच्या सामन्यात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत बजरंग पुनियाने देशासाठी सुवर्ण पदक जिंकले. कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पुनिया कडून या प्रतियोगितेसाठी देखील खूप अपेक्षा होत्या. त्याने या सर्व अपेक्षा पूर्ण करत भारताचा मान वाढवला.


बजंगने उज्बेकिस्तानच्या खासानोव सिरोजिद्दीनला १३-३ अशा अंकांनी, ताजिकिस्तानच्या फेजिएव अब्दुलकोसिमला १२-२ अशा अंकानी तर मंगोलियाच्या बातचुलुन्न बातमागनाई याला १०-० ने मात देत या फेरीत आपली जागा कायम केली होती. अखेर त्याला विजय मिळाला आणि भारतासाठी त्याने सुवर्ण पदक जिंकले.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र पुनियाचे अभिनंदन केले आहे. " हा विजय आणखी खास आहे कारण यामुळे भारताच्या खात्यात आशियायी खेळांमधील पहिले सुवर्ण पदक आले आहे." असे म्हणत त्यांनी बजरंग पुनियाचे कौतुक केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0