मराठा क्रांती मोर्चाची आज परळीमध्ये बैठक

    दिनांक  02-Aug-2018
परळी (बीड): मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची आज परळी वैजनाथ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्याभरातील सर्व संयोजक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच आंदोलनाची पुढील दिशा काय असेल यावर चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान गेल्या रविवारी देखील मराठा क्रांती मोर्चाची लातूर येथे बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सरकारला आरक्षण लागू करण्यासाठी म्हणून येत्या ९ तारखेपर्यंतची मुद्दत देण्यात आली आहे. अन्यथा ९ तारखेला राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला होता. तसेच एक तारखेपासून राज्यात जेल भरो आंदोलन करण्याचा देखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे आज परळीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.