भांडुपमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

16 Aug 2018 14:00:44




 

 

भांडुप : भांडुपमधील सह्याद्री विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. १६ विद्यार्थी व एका शिक्षकाला विषबाधा झाली असून त्यांना तातडीने मुलुंडच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 


 
 
शाळेतून दिल्या जाणाऱ्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचे कळते. जेवणानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी सुरू झाली. तसेच उलट्यांचा त्रासही सुरू झाला. या सर्व विद्यार्थ्यांची व त्यांच्या शिक्षकाची प्रकृती आता स्थिर आहे. अशी माहिती एमटी अग्रवाल रुग्णालयातील डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी दिली. मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग यांनी एमटी अग्रवाल रुग्णालयात विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0