काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा भारताला अधिकार नाही : गिलानी

15 Aug 2018 12:23:25




श्रीनगर : भारताने काश्मीरची भूमी अनधिकृतपणे बळकावलेली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा भारताला कसलाही अधिकार नाही', असे वादग्रस्त वक्तव्य काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांनी केले आहे. श्रीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.



काश्मीर जनतेचे स्वातंत्र्य पायदळी तुडवत भारताने काश्मीरचा ताबा घेतलेला आहे. काश्मीर जनतेच्या अधिकाऱ्यांचे भारताने कायम हनन केले आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा भारताला कसलाही अधिकार नाही, असे गिलानीने म्हटले आहे. तसेच काश्मिरी जनतेनी आज दिवस संपूर्ण राज्यामध्ये 'काळा दिवस' म्हणून पाळावा आणि सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन देखील हुरियत कॉन्फरन्सने केले आहे.


लाल चौकात तिरंगा फडकवल्याने दोघांना मारहाण

दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अशामध्येच श्रीनगरमधील लाल चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे मारहाण केल्याची घटना घडली आहे. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी म्हणून आलेल्या नवी दिल्लीतील दोन नागरिकांनी आज सकाळी लाल चौकामध्ये तिरंगी ध्वज फडकवला तसेच 'भारत माता कि जय' अशी घोषणा दिली. या घोषणा एकूण याठिकाणी असलेल्या काही काश्मिरी तरुणांनी भारत विरोधी घोषणा या दोघांनाही मारहाण केली. परंतु पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतले आहे.

Powered By Sangraha 9.0