यवतमाळमध्ये रंगणार यंदाचे साहित्य संमेलन

14 Aug 2018 18:45:44

 

 
 
 
मुंबई : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज घोषणा करण्यात आली आहे. यंदाचे साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार आहे. येत्या २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवड समितीने यवतमाळला भेट दिली होती. तेथे निवड समितीने जागेची पाहणी करून संमेलनासाठी यवतमाळ निश्चित करण्यात आले.
 
 
विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा, डॉ. वि.भि कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्था संमेलनासाठी एकत्र येणार आहेत. संमेलनातील कार्यक्रम व ग्रंथप्रदर्शनाच्या नियोजनाबाबत निवड समितीची २६ ऑक्टोबर रोजी सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. संमेलनाच्या मार्गदर्शन समितीची बैठक २७ ऑक्टोबरला होईल तर संमेलनाच्या महामंडळाची बैठक २८ ऑक्टोबरला होईल. अशी माहिती अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0