चंद्रयान-२ चे प्रक्षेपण येत्या जानेवारी ते मार्च दरम्यान

    दिनांक  13-Aug-2018
श्रीहरीकोटा : चंद्र मोहिमेचा दुसऱ्यातील चंद्रयान-२ चे प्रक्षेपण येत्या जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यान करण्यात येणार असल्याचे माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून देण्यात आली आहे. चंद्रयान-२ मोहिमेमध्ये काही नवे बदल करण्यात आल्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान या यानाचे प्रक्षेपण करण्याविषयी निर्णय घेतला जात असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चंद्रयान-२ ला चंद्राच्या भूमीवर उतरण्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून यानात काही नवे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये यानात काही नवे फेरबदल आणि यानाच्या वजनाविषयी चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या जानेवारी महिन्याच्या तीन तारखेला चंद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्याविषयी एकमत होत आहे, परंतु ही तारीख वाढून मार्चपर्यंत देखील जाऊ शकते. परंतु जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये चंद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्यात येईल, असे इस्रोने म्हटले आहे.