जळगाव स्था.गु.शाखेचे कारवाईसोशल मीडियावर महिलेचे बनावट खाते उघडून बदनामी करणारा जेरबंद

13 Aug 2018 13:39:03
 
 
 

जळगाव स्था.गु.शाखेचे कारवाई
सोशल मीडियावर महिलेचे बनावट खाते उघडून बदनामी करणारा जेरबंद

जळगाव, 13 ऑगस्ट
फेसबुक या सोशल मीडियावर महिलेचे बनवाट अकाउंट उघडून त्यात अश्लिल संदेश टाकून बदनामी केल्या प्रकरणी स्था.गु.शाखा तथा सायबर क्राईम जळगावने कारवाई करुन इसमास जेरबंद केले .
 
 
यावल तालुक्यतील अकलूद येथील महिलेच्या नावाचे सोशल मीडियावर(फेसबुक) बनावट अकाउंट बनवून त्यावर महिलेचे छायाचित्र टाकून त्याव्दारे तीचे व तीच्या पती संबधीत अश्लिल मजकूर टाकून बदनामी करत असल्याची घटना समोर आल्याने पीडितेच्या फिर्यादीवरुन फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाखा तथा सायबरसेलचे पो.नि. सुनिल कुराडे यांनी सायबरसेलचे अधिकारी व कर्मचा-यांना या गुन्हयाचा समांतर तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्याअनुषंगाने फेसबुककडे पत्र पाठविण्यात आले होते. सदर फेसबुक अकाउंटचे आयपी अॅड्रेस प्राप्त होताच तो आयपी अॅड्रेस सव्र्हीस प्रोव्हायडर कंपन्यांकडे पाठवून तो कोण वापरत आहे याची माहिती मिळवली. सायबार सेल पथकातील पो.उ.नि.अंगत नेमाने, पोहवा श्रीकृष्ण पटवर्धन , चंद्रकांत पाटील, पो.ना. संदीप सावळे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, पोलीस चालक दर्शन ढाकणे यांना जांबुळढाबा ता. मलकापूर जि.बुलढाणा येथे आरोपीचा शोध घेणे कामी पाठविले असता तेथून या पथकाने आरोपी रत्नदीप भीमराव ससाने यास पथकाने ताब्यात घेतले.आरोपी जवळील मोबाईल तपासला असता आरोपीने सदर बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याव्दारे महिला व तीच्या पतीसंबंधीत अश्लिल मजकूर टाकुन त्यांची बदनामी केल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाईसाठी आरोपीस यावल पेालीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0