चतुर्मास पर्वानिमित्त नाटिका सादरभुसावळात जैनबांधवांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

12 Aug 2018 12:03:09

 
 

चतुर्मास पर्वानिमित्त नाटिका सादर
भुसावळात जैनबांधवांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

 
भुसावळ, ११ ऑगस्ट
जैन बांधवांचा चतुर्मास सुरू असून भुसावळात त्यानिमित्त लोकसभा आधारित नाट्याचे ११ रोजी सादरीकरण करण्यात आले.
 
 
शहरात प.पू.श्री.डॉ. ज्ञानप्रभा म.सा. यांनी सुरू केलेल्या जैन उपवास (सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत गरम पाणी पिणे) तपोमय चतुर्मास सुरू आहे. त्यात शहरातील तपश्चर्या चंदन कोटेचा (३१ उपवास), हितेश सुराणा(१६ उपवास), मंजू कोठारी (१६ उपवास), समकित सुराणा (८ उपवास), अक्षय कोटेचा (९ उपवास), भावना चोरडिया (८ उपवास) केले आहेत. तपोमय चतुर्मास सुरू असून या पर्वामध्ये शनिवार रोजी लोकसभा या विषयावर आधारित नाटिका समकित सुराणा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यात प्रियंका लुंकड, नैनिका चोरडिया, समिक्षा गादीया, तृप्ती दोशी, डॉली कोठारी, सिमरन कुमठ, दिव्या छाजेड, अक्षय चोरडिया, समकित सुराणा, वर्धमान बाफना, शुभम ललवाणी, ललित गोठी, अभिजित कोटेचा, जयेश नहार व यश कोठारी यांनी भूमिका साकारली.
 
Powered By Sangraha 9.0