लायन्स क्लब ऑफ माहीमचे सुवर्ण महोत्सवी वर्ष!!!

01 Aug 2018 17:00:40

 
 
मुंबई : लायन्स क्लब म्हणजे की समाजासाठी वेगवेगळी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विभागात विधायक काम करणारी संस्था हेच डोळ्यासमोर येते. लायन्स क्लब ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते अगदी देश, राज्य, शहर, गाव-खेडोपाडी आदि ठिकाणी त्यांच्या कार्याचा ठसा उमटत असते. अशीच एक मुंबईतील मध्यवर्ती संस्था म्हणजे लायन्स क्लब ऑफ माहीम. लायन्स क्लब इंटरनॅशनलने नुकतीच शंभरी पूर्ण केली (स्थापना ७ जून १९१७) तर लायन्स क्लब ऑफ माहीमनेही या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
 

या सुवर्ण महोत्सवी वर्षात लायन्स क्लब ऑफ माहीमने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विभागात काम करण्याचा निर्णय अध्यक्ष लायन हर्षद सोनावाला व त्यांच्या टीमने घेतला आहे. या वर्षाच्या सुरवातीलाच शैक्षणिक कार्यक्रमाने सुरवात करताना शिवाजी पार्क येथील अतिशय जुन्या अश्या दादर विद्या मंदिरच्या दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक संच्याचे वाटप केले. त्याचबरोबर दादरच्या बालक विहार विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. त्यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

 

या वेळी लायन हर्षद सोनावाला, लायन विश्वास महाजन, लायन डॉ. श्रीधर कुलकर्णी, लायन डी. जी. आंबेकर, लायन बाळासाहेब तोरसकर, लायन अॅड. अरुण देशमुख, लायन अमोल भोसले, लायन लेडी दुर्गा कुलकर्णी, लायन लेडी मनीषा नाईक-दलाल यांच्यासह शाळेंचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकवृंध उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0