लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न किताबाने गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

01 Aug 2018 16:43:02



 
मुंबई :जागतिक कीर्तीचे साहित्यसम्राट क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय अद्वितीय योगदान असल्याने त्यांच्या कर्तृत्वाचा भारतरत्न किताबाने मरणोत्तर गौरव व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत देशभरातील जनतेला लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिल्या आहेत.
 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य माणसातील माणूस जागा करणारे माणसा माणसातील भेद दूर सारून माणूस जोडणारे माणसाला क्रांती चा धागा करणारे क्रांतिकारी साहित्य आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई चे अप्रतिम वर्णन करणारी लावणी लिहिली आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. श्रमिक कष्टकरी वर्गासाठी त्यांनी साहित्यातून संघर्ष आणि जागृती निर्माण केली. त्यांच्या साहित्यामुळे शोषित वंचित श्रमिक आणि दलितांबद्दच्या प्रश्नांबद्दल जागतिक स्तरावर सहानुभूती मिळवून दिली. असे सांगत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत तसेच त्यांच्या वाटेगावी जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

Powered By Sangraha 9.0