आषाढी एकादशी निमित्तपंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडया

09 Jul 2018 15:44:49

 
आषाढी एकादशी निमित्त
पंढरपूरसाठी  विशेष रेल्वे गाडया

भुसावळ, 9 जुलै
खान्देशातुन तसेच विदर्भातुन पंढरपूरला आषाढी एकादशीला जाणा­या भाविकांची प्रचंड गर्दी असते. भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने अमरावती- पंढरपूर व खामगाव – पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वे गाडयांचे नियोजन केले आहे.
 
 
गाडी क्र. 01155 अमरावती – पंढरपुर ही गाडी 18 आणि 20 जुलै रोजी दुपारी 2 वाजेला पंढरपूरकडे रवाना होईल ही गाडी तीच्या मार्गात न्यु अमरावती, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेहेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भीगवान, जेउर, पंढरपूर या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. तर गाडी क्र.01156 पंढरपूर - अमरावती ही गाडी याचा मार्गाने 18 व 24 जुलै रोजी सायंकाळी 5 .10 वा. न्यु अमरावतीकडे रवाना होईल.
तर गाडी क्र. 01153 खामगाव- पंढरपूर ही गाडी 18 व 21 जुलै रोजी पंढरपूरकडे रवाना होईल आणि गाडी क्र. 01154 पंढरपूर- खामगाव ही गाडी 19 व 25 जुलै रोजी पंढरपूरहून खामगावकडे रवाना होईल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0