बुरहान वाणीच्या स्मरणार्थ पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज विविध कार्यक्रम

    दिनांक  08-Jul-2018मुजफ्फराबाद : हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी याच्या मृत्यूदिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज पाकिस्तान सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथे आज वाणीच्या स्मरणार्थ रॅली आणि शोक सभांचे आयोजन करण्यात आले असून काश्मीरमधील नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील स्थानक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान राजा फारुख हैदर खान हे आज संध्याकाळी वाणीच्या स्मरणार्थ घेण्यात येणाऱ्या एका सभेला संबोधित करणार आहेत. मुजफ्फराबादमधील बुरहान मुजफ्फर वाणी चौकात या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच काश्मीर स्वतंत्र आणि भारतद्वेष या दोन विषयांवरच चर्चा होणार आहे.हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या बुरहान वाणी याचा दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने खात्मा केला होता. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय लष्कराने दहशतवादी विरोधी मोहिमेअंतर्गत वाणीचा ८ जुलै २०१६ ला खात्मा केला होता. वाणीचा मृत्यूनंतर काश्मीरमधील दहशतवादी कारवाया या अत्यंत क्षण झाल्याअसून त्याच्या मृत्यू खोऱ्यात भारतीय लष्कराला सातत्याने दहशतवाद्यांविरोधात विजय मिळू लागला आहे.