अमेरिकेच्या मागण्या गँगस्टरसारख्या

08 Jul 2018 22:44:04



 

प्योंगयांग : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात शांततेच्या मुद्द्यावर अद्याप समझोता झालेला नसल्याचे दिसून येत आहे. अण्वस्त्र निःशस्त्रीकरण मुद्द्यावर अमेरिकेच्या मागण्या ‘गँगस्टर सारख्या आहेत, अशी टीका उत्तर कोरियाकडून करण्यात आली आहे.
 

आण्विक संघर्षाचा धोका टाळण्यासाठी जूनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात झालेली ऐतिहासिक बैठक यशस्वी ठरली होती. मात्र, ही बैठक होऊन तीन आठवडे उलटले तरी दोन्ही देशांदरम्यान काही मुद्द्यांवर एकमत झालेले नाही. अण्वस्त्र निःशस्त्रीकरण म्हणजे नेमके काय? आणि त्याची खात्री कशी करणार? असे प्रश्‍न दोन्ही बाजूंनी उपस्थित करण्यात आले आहेत. शांततेच्या मुद्द्यावर दोन्ही देशांदरम्यान बैठका सुरू आहेत. यासाठी अमेरिकेचे सचिव माईक पोम्पिओ यांनी शनिवारी तिसर्‍यांदा उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगला भेट दिली. दोन दिवसांच्या दौर्‍यात त्यांनी कोरियाच्या राजधानीत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली आहे. दोन्ही देशांदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा पोम्पिओ यांनी केला आहे.

Powered By Sangraha 9.0