सोलापुर बाजार समितीत सहकार मंत्र्यांचा पराभव

    दिनांक  04-Jul-2018

शिवसेना नेते पालकमंत्री विजय देशमुख यांचे पॅनेल विजयी 


सोलापूर :
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या उलट राज्याचे पालकमंत्री आणि राज्य आरोग्यमंत्री शिवसेना नेते विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलचा मात्र दणदणीत विजय झाला असून समितीमध्ये सर्वाधिक जागांवर या पॅनेलने विजय मिळवला आहे.


बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करणे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करणे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना विश्‍वासात न घेणे, शिवसेनेला सोबत न घेणे या प्रमुख कारणास्तव सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री देशमुख, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित होत सर्वपक्षीय आघाडी केली होती. या आघाडीच्या माध्यमातूनच १५ पैकी १३ जागांवर या देशमुख यांच्या पॅनेलने विजय मिळवला असून सहकार मंत्र्यांच्या पॅनेल मात्र २ दोनच जागांवर विजय मिळाला आहे.शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक पार पडली आहे. सुभाष देशमुख यांनी सहकार मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोलापूर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. यानंतर सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचा अद्यादेश काढला होता. तसेच यानंतर काळात या निवडणुकीला देखील न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सहकारमंत्र्यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते.


निवडणुक निकालानंतरचे सहकार मंत्र्यांचे ट्वीट :