मुंबईत अपघातांची मालिका सुरूच; पहा कुठे गेले पुलाला तडे?

04 Jul 2018 12:01:00


 


मुंबई : मुंबईतील अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. काल दिवसभर घडलेल्या विविध घटनेनंतर आज पुन्हा ग्रँट रोड येथील पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रँट रोड आणि नाना चौकाला जोडणाऱ्या या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासणीनंतरच पुलाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, या पुलावरील वाहतूक केनेडी पुलावर वळवण्यात आली आहे.

 

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे या घटनेची माहिती दिली. या ट्विटमध्ये पोलिसांनी, ग्रँट रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे गेले आहे. तरी खबरदारी म्हणून वाहतूक केनेडी पुलावरुन वळवण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

 

#TrafficUpdate

— Mumbai Police (@MumbaiPolice) July 4, 2018 "

Powered By Sangraha 9.0