महापालिकेचे दुर्लक्ष उद्यानांची लावली वाट

31 Jul 2018 12:56:31
 
 
 
महापालिकेचे दुर्लक्ष उद्यानांची लावली वाट
 
जळगाव शहरातील सुसंस्कृत भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या सानेगुरूजी कॉलनी भागातील उद्यानांची महापालिकेने केलेल्या दुर्लक्षाने अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे या उद्यानांमध्ये परिसरातील नागरिकांऐवजी गुरे-ढोरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
यासंदर्भात येथील नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे निवेदनेही दिलीत. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ही निवेदने बेमुर्वतखोेर अधिकार्‍यांनी कचर्‍याच्या टोपलीत टाकून दिली. एकीकडे शहर सुशोभिकरणासाठी महापालिका इतरांपुढे हात पसरत असतांना नागरिकांच्या सहभागातून जर उद्याने रमणीय होत असतील तर काय हरकत आहे? मात्र, महापालिकेतील खाविआ राजवटीला हे शहर बकाल झालेलेच पहायचे असावे. सानेगुरूजी उद्यानातील ही छायाचित्रे त्याचे बोलके उदाहरण ठरावे.
 
 
Powered By Sangraha 9.0