मतिमंद मुलांकरिता मोफत आरोग्य शिबीर

30 Jul 2018 17:00:03



 

ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम

ठाणे : एक हात मदतीचा उपक्रम अंतर्गत मतिमंद निवासी विद्यालय, मुरबाड येथील मुलांकरिता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन भाजपा दिवा-शीळ विभाग अध्यक्ष निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अमित मोकाशी, सचिव रोशन कदम, मुंब्रा विभाग अध्यक्ष संतोष पांडे, अबिटघर विभाग अध्यक्ष स्वप्नील भोईर, कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष अक्षय शिंदे, विकास वेखंडे, आर्या कदम आदी उपस्थित होते.

 

समाजकार्यात अग्रेसर असलेल्या ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे “मतिमंद मुलांना मदत हेच खरे जीवन” असे बोध वाक्य प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनामध्ये घेऊन एक महिन्यापूर्वी मतिमंद मुलांना धान्य आणि खाऊ वाटप केले होते. त्यावेळी या मुलांकरिता अजून काही मदत करता येईल. या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. रोहित असरानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. शाळेतील सर्व मुलांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराला अवनी मतिमंद शाळेच्या संस्थापिका रुचिका इरकशेट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Powered By Sangraha 9.0