केडीएमटीत जेष्ठांना मिळणार ५० टक्के सवलत

30 Jul 2018 18:43:01



 

सभापतींच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय मान्यता

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहनच्या प्रवास जेष्ठांना सवलतीत उपलब्ध होणार आहे सोमवारी पार पडलेल्या परिवहन सभेत या सबंधीत प्रस्ताव परिवहन सभापती सुभाष म्हस्के यांनी मांडला याला सर्व पक्षीय सदस्यानी मंजूरी दिली.

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदाते जेष्ट नागरिक ज्यांच्याकडे जेष्ट नागरिकत्वाचा दाखलआ आहे अशाच जेष्ट नागरिकांना परिवहन उपक्रमामध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव सभापती म्हस्के यांनी मांडला . या प्रस्तावास तत्काळ मंजुरी दिली .मात्र या साठी जेष्ट नागरिक दाखल्या ऐवजी आधारकार्डकची सक्ती करण्यात यावी तसेच सुमारे १०० ते १५० रु ने दर आकारून पास देण्यात यावा असे जाहीर करण्यात आले . या संदर्भात सभापती म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता .भिवडी ,ठाणे तसेच इतर महानगरपालिके प्रमाणे कल्याण डोंबिवलीत ही अशा प्रकारचे उपक्रम होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

Powered By Sangraha 9.0