मुंबई झाली पुन्हा एकदा तुंबापुरी....

03 Jul 2018 11:41:50
 
 
 
 
 
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली असून आता नेहमीप्रमाणे मुंबई यावर्षी देखील तुंबापुरी झाली आहे. मुंबईमधील काही महत्वाच्या भागात पावसाच्या पाण्यामुळे चांगलीच जनतेची तारांबळ उडाली आहे. काल सोमवार असल्याने नागरिक कार्यालयात जाण्याच्या घाईने घराबाहेर पडले मात्र वाटेत सुरु असलेल्या पावसाने आणि साचलेल्या पाण्याने जनतेला चांगलेच बुचकळ्यात पाडले. 
 
 
 
 
सायन, माटुंगा, दादर, डोंबिवली, माहीम, सांताक्रूझ, कुलाबा आणि अंधेरी याठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे लोकल देखील धीम्या गतीने धावत आहे. सेन्ट्रल रेल्वेला नेहमीप्रमाणे पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने आज सकाळपासूनच वाहतूक आणि रेल्वे व्यवस्था संथ गतीने पुढे चालत आहे. 
 
 
 
 
सोशल मिडियावर देखील ‘मुंबई पाऊस’ असा हॅश टॅग सुरु झाला आहे. सोशल मिडियावर मुंबईच्या पावसाची चांगलीच खिल्ली उडविली जात आहे. नेहमीच्या पावसाच्या समस्येने मुंबईकर कंटाळले आहेत. मात्र आता निसर्गापुढे काय चालणार असे म्हणून सध्या मुंबईकर या समस्येला दुर्लक्षित करत आहेत. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0