कॉंग्रेस कार्यालयात लैंगिक छळ झाल्याची तक्रार

03 Jul 2018 19:40:18


सोशल मिडिया विभागातील मुलीचा सहकाऱ्याकडून छळ

कॉंग्रेसकडून इन्कार, भाजपकडून चौकशीची मागणी

 

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या सोशल मिडिया विभागात काम मारणाऱ्या एका युवतीचा तिच्या सहकाऱ्याकडूनच लैंगिक छळ करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाला वाचा फोडली असून याप्रकारची एक तक्रार पिडीत युवतीने केली असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच, पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करावी, अशीही मागणी भाजपने केली आहे.

 
 
 

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. कॉंग्रेसच्या सोशल मिडिया विभागातील एक माजी कार्यकर्ता युवतीने तिचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. ही महिला कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मिडिया विभाग प्रमुखाच्या हाताखाली काम करत होती, असे लेखी यांनी सांगितले. तसेच, पोलिसांनी तातडीने या पिडीत युवतीच्या तक्रारीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या युवतीला तिच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

 
 

दरम्यान, कॉंग्रेसकडून या गंभीर आरोपाचे खंडन करण्यात आले असून, आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून अशा प्रकारची लैंगिक छळाची तक्रार आमच्यापर्यंत आली नसल्याचे दिल्ली कॉंग्रेसच्या सोशल मिडिया विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी स्पष्ट केले.

Powered By Sangraha 9.0