मराठा आंदोलकांकडून शिवसेना खासदार खैरेंना धक्काबुक्की

    दिनांक  24-Jul-2018

शिंदेंच्या अंत्यविधीमधून धक्काबुक्की करून खैरेंची हकालपट्टी

कायगाव (औरंगाबाद) : मराठा आरक्षणासाठी नदीत उडी टाकून जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारावेळी मराठा आंदोलकांनी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरा यांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकार घडला आहे. खैर हे शिंदे यांच्या अंत्यसंस्कार विधीला आल्यामुळे उपस्थित जमावाने खैर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत धक्काबुक्की करून त्यांची हकालपट्टी केली आहे.

आज औरंगाबादेतील कायगाव येथे आज शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील तरुण याठिकाणी उपस्थित होते. शिंदे यांच्या लहान भावाने त्यांना अग्नी दिल्यानंतर थोड्याच वेळात शिवसेना खासदार खैरे हे याठिकाणी आले. यानंतर संतप्त जमावाने खैर आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत, खैर यांना परत जाण्याचे निर्देश दिले. परंतु खैरे पुढे येत असल्याचे पाहून जमावाने त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खैरे यांच्या सुरक्षारक्षकांना आणि सचिवांनामध्ये येऊन खैरे यांना वाचवत गाडीत बसवावे लागले. व यानंतर सरळ गाडी खैरे निवासस्थानाकडे नेण्यात आली.
 
दरम्यान शिंदे यांच्या मृत्युनंतर औरंगाबाद शहरामधील वातावरण कमालीचे तापले आहे. औरंगाबादमधील मराठा समाजाने जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला असून जिल्ह्यातून जाणारे महामार्ग देखील रोखले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील जनजीवनावर याचा परिणाम पडत असल्याचे दिसत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील शांतता भंग होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे.