कॉंग्रेसचा कोणावरच विश्वास नाही : संबित पात्रा

22 Jul 2018 20:32:59



नवी दिल्ली : कॉग्रेस पक्ष हा फक्त एका कुटुंबाच्या भल्यासाठी झटत असून या पक्षाचा देशाच्या कोणत्याही संवैधानिक घटनेवर विश्वास नाही' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.

'कॉंग्रेस पक्ष हा फक्त आपल्या स्वतःचा राजकीय स्वार्थ पाहत आहेत. राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी म्हणून या पक्षाचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. यासाठी म्हणून कॉंग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव लोकसभेत मांडला परंतु त्यावर बहुमत मोदींच्या बाजूनी असल्यामुळे काँग्रेसचा याठिकाणी देखील पराभव झाला. त्यामुळे देशाच्या कोणत्याही संवैधानिक घटनेवर, न्यायालयावर आणि सामान्य जनतेवर देखील कॉंग्रेस पक्षाचा विश्वास नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे पात्रा यांनी म्हटले.

सुदैवाने लोकसभेत इव्हीएम वापरले नाही.

लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या बहुमत चाचणी वेळी सुदैवाने इव्हीएमचा वापर करण्यात आला नाही. नाही तर कॉंग्रेसने यावरून देखील गदारोळ उठवत मोदी सरकार बहुमत जिंकूच कसे शकते ? असा प्रश्न निर्माण केला असता, अशी खोचक टीका देखील पात्रा यांनी यावेळी केली.

Powered By Sangraha 9.0