रजत शर्मा यांची दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या अध्यपदी निवड

02 Jul 2018 16:10:46

 
 
दिल्ली :  प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. राकेश कुमार बंसल यांची निवड उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे. रजत शर्मा यांना ५४.४ मते मिळाली आणि त्यामुळे त्यांचा दणदणीत विजय झाला. माजी क्रिकेटपटू मदनलाल यांचा पराभव करत रजत शर्मा यांनी विजय मिळवला.
 
 
 
 
 
 त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण देशातून आनंद व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
 
 
 
या कार्यकारिणीच्या निवडीसाठी ३० जून रोजी मतदान करण्यात आले होते. रजत शर्मा यांना १५३१ मते मिळाली तर मदनलाल यांना १००४ मते मिळाली. तसेच तिसरे उमेदवार वकील विकास सिंह यांना केवळ २३२ मते मिळाली. मदनलाल हे १९८३ मध्ये वर्ल्डकप पटकावणाऱ्या विजयी संघात सहभागी होते.
 
रजत शर्मा गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. त्यांचा ''आप की अदालत" हा कार्यक्रम गेल्या २५-३० वर्षांपासून प्रसिद्ध आहे. त्यांना २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. प्रसिद्ध वाहिनी इंडिया टीव्ही याचे ते अध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0