औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे ५ जूलै रोजी रोजगार मेळावा

    दिनांक  02-Jul-2018
 
 
हिंगोली :  यशस्वी इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे तर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे आय.टी.आय. उत्तीर्ण बेरोजगारांना 36 कंपनी मध्ये रोजगार मिळवून देण्याकरिता गुरुवार दिनांक 5 जुलै, 2018 रोजी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर भरती मेळाव्यात विविध कंपनीमध्ये एकूण 550 जागेसाठी निवड करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा रु.8,800 ते रु.14,600 या दरम्यान वेतन देण्यात येईल.
 
 
 
बहुतेक कंपनीमध्ये बस व उपहार गृहाची सोय उपलब्ध आहे. सदरील कंपनी ह्या पुणे शहर परिसरातील आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सं. प्र. भगत, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी केले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वी डिप्लोमा इन मॅकॅनिकल, बी. एससी., बी.सी.ए., एस.सी., केमिस्ट्री, एम.एस्सी. मायक्रो उत्तीर्ण बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी भरती मेळाव्याकरीता स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोबत शैक्षणिक अहर्तेचा छायांकित प्रतीचे कागदपत्रे, आधार कार्डची छायांकित प्रत व दोन पासपोर्ट साईज फोटो आणावे असे प्राचायर्‍ औद्यागिक प्रशिक्षण संस्था हिंगोली यांनी कळविले आहे.