खान्देशरत्न डॉ.टी.डी.कुडे यांना अखेरचा भावपूर्ण निरोप

17 Jul 2018 11:17:46

हजारो नागरिकांची उपस्थिती

 
 
धरणगाव  :
जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच रा.स्व.संघाचे जेष्ठ स्वयंसेवक तथा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. टी. डी. कुडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून सजवलेल्या स्वर्गरथासह अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
 
 
बालकवी ठोंबरे विद्यालय, भाजपा कार्यालय, दि अर्बन बॅक व लाड शाखीय वाणी समाज कार्यालयानजिक विसावा देत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा बाजार समिती जवळील स्मशानभूमीत आली, तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
समरसता मंचचे प्रदेश प्रवक्ते प्रा. रमेश नथ्थू महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सचिव डी.जी.पाटील, लाड शाखीय वाणी समाज मंडळातर्फे सचिव सुधाकर शेठ वाणी यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
 
 
रा.स्व.संघाचे पश्‍चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, उमविचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीपदादा पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलीम पटेल, भाजपानेते सुभाष पाटील, शिरीष बयस, तालुकाध्यक्ष संजय महाजन, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी यांच्यासह विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0