सुरत- भुसावळ पॅसेंजर जळगावलाच थांबली

16 Jul 2018 12:27:04

प्रवाशांचे हाल

जळगाव, १६ जुलै :
सुरत स्थानकाहुन सुटलेली गाडी क्र. ५९०१३ ही भुसावळ स्थानकापर्यंत न जाता जळगाव स्थानकावरच थांबल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पुर्व सूचना न देता ही गाडी थंाबविल्याने प्रवाशांमध्ये संताप दिसून आला.
 
 
मध्य रेल्वेच्या भुसावळ, भादली आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर काम करण्यासाठी ७ जुलै रोजी ५ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस व सुरत भुसावळ पॅसेंजर (अप आणि डाउन ) रद्द करण्यात आला होती. तसे प्रसिध्दी पत्रक रेल्वे प्रशासनाने काढले होते. परंतु १६ रोजी पुन्हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे सुरत- भुसावळ ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. ही गाडी भुसावळपर्यंत जाणार नसल्याचे जळगाव स्थानकार सांगण्यात आले. सुरतपासून भुसावळ जाणारे आणि नियमित या गाडीने जळगावहून भुसावळला जाणार्‍या नोकरदारांचे सोमवारी हाल झाले. रेल्वे प्रशासनाने तशी पूर्व सूचना द्यायला हवी होती अशी चर्चा प्रवाशी करत होते.
 
 
याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता हा बदल केवळ एक दिवसापुरता असून उद्यापासून ही गाडी भुसावळ स्थानकापर्यंत जाणार असल्याचे संागण्यात आले.
Powered By Sangraha 9.0